ज्योती कांबळी - लेख सूची

देव नाकारणे हे विवेकवादाचे बाय-प्रॉडक्ट

ब्राईट्स सोसायटीच्या दशकपूर्तीला नास्तिक परिषदेच्या निमित्ताने जमलेले आपले माननीय प्रमुख पाहुणे जावेद अख्तरजी, मंचावरील आणि उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या सर्व नास्तिक मुक्तचिंतक मित्र-मैत्रिणींनो. सर्वप्रथम, या पुरस्कारासाठी माझी निवड केली यासाठी ब्राईट्स सोसायटीच्या सर्वांचे मनापासून आभार मानते. अतिशय प्रांजळपणे सांगायचं तर हा पुरस्कार प्राप्त करण्याची पात्रता माझी आहे की नाही हे मला अजिबात माहीत …

नास्तिकांची मांदियाळी 

नास्तिक्य हा सहसा लोकांच्या फार आवडीचा नसलेला किंवा दुर्लक्षित केलेला विषय. मग नास्तिक म्हणजे स्वतःला जास्त शहाणे समजणारे, दीड शहाणे, आगाऊ, इथपासून ते नास्तिकता म्हणजे टोकाची भूमिका घेणे इथपर्यंत बिरुदांचा वर्षाव केलेला असतो. आणि हे सगळं करताना नास्तिक, नास्तिक्य, बुद्धिप्रामाण्य, विवेक म्हणजे नेमकं काय, हे येतं कुठून, भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासात नास्तिकांची परंपरा किती मोठी आहे, …